सध्या राज्यात अवकाळी पावसाने हाहाःकार माजला आहे. गारपिटीसह पावसाने शेतमालाचे प्रचंड नुकसान केलं आहे.
2/ 7
महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात गारपीट झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. पण, गारपीट का होते? असा प्रश्न अनेकांना पडला आहे.
3/ 7
पावसाळ्यात अनेक वेळा अचानक बर्फाचे छोटे तुकडे पाण्याच्या थेंबासोबत पडू लागतात, ज्याला आपण गारपीट म्हणजेच हेल स्टॉर्म म्हणतो.
4/ 7
बर्फ ही पाण्याची घन अवस्था आहे. ते पाणी गोठण्याने तयार होते.
5/ 7
काही वेळा ढगांमधील तापमान शून्याच्या खाली जाते. अशावेळी ढगांशी जोडलेली आर्द्रता पाण्याच्या लहान थेंबांमध्ये बर्फाच्या गोलाकार तुकड्यांमध्ये बदलते.
6/ 7
या तुकड्यांचे वजन जास्त झाले की ते खाली पडू लागतात. जेव्हा हे बर्फाचे तुकडे खाली पडतात तेव्हा ते वातावरणातील गरम हवेच्या संपर्कात आल्याने वितळू लागतात.
7/ 7
काही बर्फाचे मोठे तुकडे पूर्णपणे वितळण्याच्या अगोदरच जमिनीपर्यंत पोहचतात. यालाच आपण गारांचा पाऊस किंवा गारपीट म्हणतो.