advertisement
होम / फोटोगॅलरी / Explainer / PHOTOS: जगातील सर्वात शक्तिशाली शहर जाणार पाताळात! गगनचुंबी इमारती बनतंय विनाशाचे कारण

PHOTOS: जगातील सर्वात शक्तिशाली शहर जाणार पाताळात! गगनचुंबी इमारती बनतंय विनाशाचे कारण

न्यूयॉर्क हे गगनचुंबी इमारतींसाठी जगभरात प्रसिद्ध आहे. पण नुकत्याच आलेल्या एका नव्या अहवालात एक खळबळजनक खुलासा झाला आहे. न्यूयॉर्क शहर हळूहळू खचत आहे आणि गगनचुंबी इमारती त्याला खाली आणत आहेत, असे या अहवालात सांगण्यात आले आहे.

01
न्यूयॉर्क पोस्टच्या अहवालानुसार, न्यूयॉर्कमधील दहा लाखांहून अधिक इमारतींचे वजन सुमारे 1.7 ट्रिलियन पौंड आहे. हे संशोधन यूएस जिओलॉजिकल सर्व्हे आणि रोड आयलँड विद्यापीठातील भूवैज्ञानिकांनी केले आहे. (@dragon_of_time_)

02
संशोधकांना असे आढळून आले की शहर दरवर्षी 1-2 मिलिमीटर दराने खचत आहे. उपग्रह प्रतिमांच्या तुलनात्मक अभ्यासानंतर शास्त्रज्ञ या निष्कर्षावर आले आहेत. संशोधकांनी पुढे सांगितले की लोअर मॅनहॅटनसारखे काही भाग खूप वेगाने खतच आहेत. तर ब्रुकलिन आणि क्वीन्स दोन्ही चिंतेचा विषय आहेत. (@GilbertKElisa)

03
युनायटेड स्टेट्स जिओलॉजिकल सर्व्हेचे प्रमुख संशोधक आणि भूगर्भशास्त्रज्ञ टॉम पार्सन्स म्हणाले की, न्यूयॉर्क शहर दरवर्षी पुराच्या धोक्याच्या आव्हानांना तोंड देत आहे. अटलांटिक किनाऱ्यावरील पूर्व अमेरिकेतील सर्वात प्रभावित शहर. येथे अटलांटिक समुद्राची पातळी सरासरीपेक्षा 3 ते 4 पट जास्त आहे. (@holamoncat_en)

04
या निष्कर्षांनी पुराचा धोका आणि वाढत्या समुद्र पातळीचा सामना करण्यासाठी नवीन धोरणे विकसित करण्याच्या प्रयत्नांना प्रोत्साहन दिले पाहिजे, असे अहवालाचे लेखक असलेल्या प्रमुख शास्त्रज्ञाने सांगितले. भविष्यात न्यूयॉर्क कसे वाचवायचे याबाबत नवीन धोरण आखले पाहिजे. (एपी)

05
अभ्यासाचे वर्णन करताना, सायन्स अलर्टने सांगितले की संशोधकांच्या टीमने न्यूयॉर्क शहरातील 1 दशलक्षाहून अधिक इमारतींच्या एकत्रित वस्तुमानाची गणना केली, जे 764,000,000,000 किलो किंवा 1.68 ट्रिलियन पौंड इतके होते. शहराची 100 बाय 100 मीटर स्क्वेअरच्या ग्रिडमध्ये विभागणी करण्यात आली होती. गुरुत्वाकर्षण आणि इमारतींच्या दाबाचा अभ्यास करण्यात आला. एवढ्या मोठ्या वजनामुळे न्यूयॉर्क शहर खचत आहे. (एपी)

06
संशोधकांनी रस्ते, फुटपाथ, पूल, रेल्वे आणि इतर पक्की क्षेत्रे सोडून इमारतींवर लक्ष केंद्रित केले. संशोधकांनी इशारा दिला आहे की वाढते शहरीकरण, ज्यामध्ये भूजल उत्खनन आणि पंपिंगचा समावेश आहे, न्यूयॉर्कच्या समस्येत आणखी भर पडू शकते. (एपी)

  • FIRST PUBLISHED :
  • न्यूयॉर्क पोस्टच्या अहवालानुसार, न्यूयॉर्कमधील दहा लाखांहून अधिक इमारतींचे वजन सुमारे 1.7 ट्रिलियन पौंड आहे. हे संशोधन यूएस जिओलॉजिकल सर्व्हे आणि रोड आयलँड विद्यापीठातील भूवैज्ञानिकांनी केले आहे. (@dragon_of_time_)

    MORE
    GALLERIES