अनेक दशकांपासून रोहिंग्यांना म्यानमारमध्ये हिंसाचार, भेदभाव आणि छळाचा सामना करावा लागत आहे. 2017 पासून त्यांचे सर्वात मोठे स्थलांतर सुरू झाले. त्यावेळी म्यानमारच्या रखाइन राज्यात हिंसाचाराची मोठी लाट उसळली होती. 7 लाखांहून अधिक लोकांना म्यानमार सोडून बांगलादेशात पलायन करावे लागले. (फोटो- ट्विटर/हरदीप सिंग पुरी)
रॉयटर्सच्या अहवालानुसार, म्यानमारमधील 980,000 हून अधिक निर्वासित बांगलादेश आणि भारतासह शेजारच्या देशांमध्ये आश्रय घेऊ इच्छित आहेत. त्याच वेळी, बांगलादेशातील कॉक्स बाजार भागातील कुतुपालॉंग आणि नयापारा निर्वासित शिबिरांमध्ये 9 लाखांहून अधिक रोहिंग्या निर्वासित राहत आहेत. जे जगातील सर्वात मोठे आणि सर्वात दाट लोकवस्तीचे कॅम्प आहे.