रावत यांचे शालेय शिक्षण डेहराडूनमधील कँब्रियन हॉल स्कूल, शिमला येथील सेंट एडवर्ड स्कूल आणि इंडियन मिलिटरी अकादमी, डेहराडूनमधून झाले. यानंतरही त्यांनी आपला अभ्यास सुरूच ठेवला. त्यांनी एमफिल आणि नंतर पीएचडी केली. 2011 मध्ये त्यांना चौधरी चरणसिंग मेरठ येथून लष्करी-मीडिया स्ट्रॅटेजिक स्टडीजवरील संशोधनासाठी पीएचडी प्रदान करण्यात आली.
आपल्या प्रदीर्घ कारकिर्दीत अनेक प्रकारच्या लष्करी कारवाया आणि कारवाईत सहभागी होणाऱ्या अधिकाऱ्यांमध्ये त्यांचा समावेश होता. संयुक्त राष्ट्रांच्या अनेक मोहिमांमध्येही त्यांचा सहभाग होता. प्रत्येकवेळी त्यांचे शौर्य, समजूतदारपणा आणि लष्करी रणनीती सर्वांनी मान्य केली. यामुळेच त्यांची सैन्यात एका पदावरून दुसऱ्या पदावर प्रगती होत राहिली.