advertisement
होम / फोटोगॅलरी / Explainer / चंद्रावरील उष्णतेचा सामना करण्यासाठी NASA विकसित करतोय खास स्पेस सूट! काय आहेत फिचर?

चंद्रावरील उष्णतेचा सामना करण्यासाठी NASA विकसित करतोय खास स्पेस सूट! काय आहेत फिचर?

चंद्रावर (Moon) जाणाऱ्या आर्टेमिस मिशनच्या प्रवाशांसाठी नासा (NASA) एक खास स्पेससूट (Space Suit) तयार करत आहे. या स्पेस सूटचे वैशिष्ट्य म्हणजे याच्या कूलिंग कंट्रोल टेक्नॉलॉजीमध्ये पाण्याचा वापर करण्यात आला आहे, ज्यामुळे चंद्राच्या गरम पृष्ठभागावरील प्रवाशांना तिथे थंड राहण्यास मदत होईल. आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकावरही या सूटचे प्रयोग सुरू आहेत.

01
अंतराळ आणि चंद्राची परिस्थिती पृथ्वीपेक्षा खूप वेगळी आहे. तिथे वातावरण नाही. तापमान जाणवू शकत नाही, त्वचेवर आणि शरीरावर वातावरणाचा दाब नसतो. परंतु, अंतराळात सूक्ष्म गुरुत्वाकर्षण म्हणजेच गुरुत्वाकर्षणाचा वेगळा परिणाम होतो. अशा सर्व परिस्थितींना तोंड देण्यासाठी एक विशेष प्रकारचे स्पेस सूट डिझाइन केले जाते. ज्यामध्ये अंतराळ प्रवास आरामदायी, सुरक्षित आणि आरोग्यदायी वाटू शकतो. चंद्रावरील आर्टेमिस मोहिमेसाठी नासा (NASA) Spacesuit Evaporation Rejection Flight Experiment (SERFE) वापरत आहे. (प्रतिकात्मक फोटो: नासा)

02
नासा (NASA) चंद्राच्या परिस्थितीसाठी विशेष प्रकारचे स्पेससूट (Space Suite) तयार करण्यात गुंतले आहे. जे चंद्राच्या 100 अंश सेल्सिअसच्या उकळत्या तापमानाला तोंड देऊ शकते. नासाचे चंद्रावर लांब मानवीय मोहिमा पाठवण्याचे उद्दिष्ट असल्याने, ते सध्या या गरजा पूर्ण करू शकतील अशाच स्पेस सूटची रचना करत आहे. NASA ला Spacesuit Evaporation Rejection Flight Experiment, SERFE कडून खूप आशा आहेत. (प्रतिकात्मक फोटो: नासा)

03
SERFE प्रयोगाद्वारे विकसित केलेल्या स्पेस सूटच्या चाचण्या आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक (ISS) आणि पृथ्वीवर दोन्ही ठिकाणी सुरू आहेत. या स्पेससूट्सचा महत्त्वाचा भाग म्हणजे त्याची लाईफ सपोर्ट सिस्टीम (life support system) जी अंतराळवीर आणि त्यांचे स्पेस सूट थंड ठेवेल. आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाच्या सूक्ष्म गुरुत्वाकर्षणासारख्या वातावरणात हे नवीन उष्णता नियंत्रण तंत्रज्ञान प्रदर्शित करण्यासाठी SERFE डिझाइन केले गेले आहे. यामध्ये, थर्मल कंट्रोल लूप संपूर्ण सूटमध्ये पाण्याचा प्रवाह प्रसारित करतो ज्यामुळे अंतराळवीर आणि सूटमधील इलेक्ट्रॉनिक उपकरणे थंड राहू शकतात. (फोटो: नासा)

04
SERFE प्रयोगाचे थर्मल कंट्रोल तंत्रज्ञान भविष्यातील स्पेसवॉकसाठी देखील उपयुक्त ठरू शकते. या प्रयोगात शास्त्रज्ञ वॉटर कूलिंग सिस्टिमचीही चाचणी घेणार आहेत. या स्पेस सूटमध्ये प्रेशर सेन्सर्स असतील जे गरम पाण्याची वाफ अवकाशात सोडण्यास सक्षम असतील, ज्यामुळे थर्मल कंट्रोल लूपद्वारे सेट तापमान राखण्यात मदत होईल. (फोटो: नासा)

05
व्हिडिओ शेअर करून नासाने (NASA) अपोलो मिशनपासून (Apollo Missions) आतापर्यंतच्या स्पेस सूटच्या संपूर्ण इतिहासाची माहिती दिली आहे. स्पेस सूटशी संबंधित जे प्रयोग आणि चाचण्या केल्या जात आहेत, असेच प्रयोग नासाच्या ह्यूस्टन येथील जॉन्सन स्पेस सेंटरमध्येही केले जात आहेत. SERFE हे अंतराळवीरांच्या पाठीमागे बसवलेले ओव्हन-आकाराचे उपकरण आहे ज्याचे काम संपूर्ण स्पेससूटमध्ये पाण्याचा नियमित पुरवठा राखणे हे असेल. (फोटो: नासा)

06
अंतराळवीर (Astronauts) हे उपकरण त्यांच्या पाठीवर घेऊन चंद्राच्या टेकड्या आणि खडकांवर फिरतील आणि त्यांच्या इतर महत्त्वाच्या प्रयोगांवर काम करतील, अभियंत्यांना त्याचा आकार शक्य तितका लहान ठेवायचा आहे. नासाच्या म्हणण्यानुसार, पाण्याचा कुलंट म्हणून वापर करण्याची कल्पना अपोलो युगाप्रमाणेच जुनी आहे. त्यावेळी शास्त्रज्ञांनी चंद्राच्या प्रवाशांना जास्त उष्णता जाणवू नये म्हणून कपड्याच्या माध्यमातून पाणी पसरवण्याचा निर्णय घेतला होता. (फोटो: नासा)

07
NASA अंतराळवीर सध्या स्पेस स्टेशन (ISS) वर वापरत असलेला स्पेस सूट 1970 मध्ये स्पेसवॉकसाठी (Spacewalk) विकसित करण्यात आला होता. पाणी अजूनही कुलंट म्हणून वापरले जात असताना, नासाचा असा विश्वास आहे की अजूनही सुधारण्यासाठी भरपूर वाव आहे. नवीन स्पेस सूटसाठी, स्पेस सूटची पुढील पिढी विकसित करण्यासाठी NASA त्याचे डिझाइन, संशोधन आणि डेटा व्यावसायिक उद्योगांसह सामायिक करणार आहे. (फोटो: नासा)

  • FIRST PUBLISHED :
  • अंतराळ आणि चंद्राची परिस्थिती पृथ्वीपेक्षा खूप वेगळी आहे. तिथे वातावरण नाही. तापमान जाणवू शकत नाही, त्वचेवर आणि शरीरावर वातावरणाचा दाब नसतो. परंतु, अंतराळात सूक्ष्म गुरुत्वाकर्षण म्हणजेच गुरुत्वाकर्षणाचा वेगळा परिणाम होतो. अशा सर्व परिस्थितींना तोंड देण्यासाठी एक विशेष प्रकारचे स्पेस सूट डिझाइन केले जाते. ज्यामध्ये अंतराळ प्रवास आरामदायी, सुरक्षित आणि आरोग्यदायी वाटू शकतो. चंद्रावरील आर्टेमिस मोहिमेसाठी नासा (NASA) Spacesuit Evaporation Rejection Flight Experiment (SERFE) वापरत आहे. (प्रतिकात्मक फोटो: नासा)

    MORE
    GALLERIES