13 जानेवारी 1936 रोजी वर्धा रेल्वे स्थानकावर एक इंग्रज महिला उतरली. ती खास एका उद्देशाने गांधींना भेटायला आली होती. मार्गारेट सेंगर असं या र्भनिरोधक तज्ज्ञ महिलेचं नाव होतं. वर्धा स्टेशनपासून आश्रमापर्यंत ते बैलगाडीतून पोहोचले. गांधी जमिनीवर शाल गुंडाळून त्यांची वाट पाहत बसले होते. तिने गांधीजींसाठी अनेक भेटवस्तू आणि पुस्तके आणली होती. (फाइल फोटो)
मिस सेंगर यांनी 1917 मध्ये न्यूयॉर्कमध्ये गर्भनिरोधक क्लिनिक उघडले होते. अमेरिकेत त्यांनी महिलांना गर्भनिरोधकाबाबत जागरूक करण्यासाठी चळवळ सुरू केली, असं म्हणता येईल. मात्र, त्यांच्या या कामामुळे प्युरिटन आणि कॅथलिक दोघेही त्यांच्या विरोधात गेले. "महिलेच्या शरीरावर केवळ तिचा अधिकार आहे" असं सेंगर म्हणायची. मार्गारेट सेंगरला कैद करण्यात आले. मात्र, तिचं काम सुरुच राहिलं. (फाइल फोटो)
गर्भनिरोधक पद्धती भारतातही वापरल्या जाव्यात अशी तिची इच्छा होती. या मोहिमेत गांधी आपल्याला फारशी मदत करणार नाहीत याची त्यांना कल्पना होती. मार्गारेट जेव्हा आश्रमात पोहोचली तेव्हा गांधींनी तिचे स्वागत केले, पण तो दिवस शांतता, ध्यान आणि प्रार्थनेचा होता. काहीही होऊ शकले नाही. मार्गारेटला अतिथींच्या खोलीत नेण्यात आले. चार खोल्यांचं छोटंसं घर होतं. जिथे गाद्या आणि दगडी टेबल आणि खुर्च्या नसलेल्या खाटा होत्या. (फाइल फोटो)
रॉबर्ट पेन यांच्या ‘लाइफ अँड डेथ ऑफ महात्मा गांधी’ या पुस्तकानुसार आश्रमातील वातावरण सेंगरला फारसे आकर्षित करू शकले नाही. तेथे सिंचनासाठी क्रशर व लाकडी चाकाचा वापर केला जात होता. गांधी जाणूनबुजून यंत्रांकडे पाठ का फिरवत आहेत, असा प्रश्न त्यांना पडला होता. पण गांधींच्या आजूबाजूला तेजोमय वातावरण आहे हेही त्यांच्या लक्षात आले. गांधी सुस्वभावी यजमान असल्याने मार्गारेटला आशा वाटू लागली की ते तिला समजून घेतील. (विकी कॉमन्स)
दुसऱ्या दिवशी मार्गारेट गांधींना भेटली तेव्हा तिने त्यांच्या युक्तिवादाने त्यांचे मन वळवण्याचा प्रयत्न केला. पण तिने युक्तिवाद मांडताच गांधींनी तिचा प्रतिवाद केला. त्यांच्याकडे एकच तत्त्व होते, ज्यापुढे मार्गारेटचे सर्व युक्तिवाद फोल ठरत होते. गांधींच्या मते, "प्रजनन उद्देश वगळता लैंगिक संबंध हे पाप आहे, जोडप्याने त्यांच्या वैवाहिक जीवनात फक्त तीन किंवा चार वेळा लैंगिक संबंध ठेवले पाहिजेत, कारण कुटुंबासाठी तीन किंवा चार मुलांची आवश्यकता असते. जन्म नियंत्रणाची एकमेव प्रभावी पद्धत म्हणजे जोडप्याने पूर्ण ब्रह्मचर्य पाळणे, जेव्हा मुलाची खरी गरज असते तेव्हाच लैंगिक संबंध ठेवणे." (maragret sanger blog)
गांधी अतिशय शांत आणि संयमित शब्दात आपला युक्तिवाद मांडत होते. सेंगर जरा विचलित झाल्या. त्यांना असे वाटले की त्यांचं म्हणणं गांधीपर्यंत पोहचत नाहीय. गांधींचे जन्म नियंत्रणाबद्दलचे विचार त्यांच्या स्वतःच्या जीवनातील अनुभवांवर आधारित होते. सेंगर यांनीही शुद्ध नैसर्गिक उपाय सुचवले. वर्ध्यात लिंबाची झाडेही होती आणि तिथे कापसाचे उत्पादनही भरपूर होते. दोन्ही पूर्णपणे नैसर्गिक होते. लिंबाच्या रसात बुडवलेला कापूस हा एक सोपा गर्भनिरोधक होता. या पद्धतीवरही गांधीजींचा तीव्र आक्षेप होता. त्यांच्या मते, कापसाची लिंट देखील नैसर्गिक प्रक्रियेत एक अनैसर्गिक अडथळा होता. (मार्गारेट ब्लॉग)
"महिलांनी आपल्या पतीला विरोध करायला शिकले पाहिजे आणि गरज पडल्यास नवऱ्याला सोडून जाण्यास शिकले पाहिजे." गांधींचा असा विश्वास होता की स्त्रियांना त्यांच्या पतीच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी अनिच्छुक साधन व्हावं लागतं. ते म्हणाले, "माझ्या पत्नीला मुख्य केंद्र बनवून मी इतर स्त्रीयांचं आयुष्य जाणलं आहे. दक्षिण आफ्रिकेतील अनेक युरोपियन महिलांशी माझी ओळख झाली. माझ्या मते संपूर्ण दोष पुरुषांचा आहे. जर उरलेल्या वर्षांमध्ये मी महिलांना विश्वास देऊ शकलो की त्या देखील स्वतंत्र आहेत, तर भारतात लोकसंख्या नियंत्रणाची कोणतीही अडचण येणार नाही. माझ्या ओळखीच्या महिलांना मी निषेध करण्याच्या पद्धती शिकवल्या आहेत, पण खरी समस्या ही आहे की त्यांना विरोध करायचा नाही." (फाइल फोटो)
गांधी ब्रह्मचर्य आणि या विषयावर खूप बोलू शकत होते. सेंगरला वाटायचं की गांधी कुठेही असले तरी सुख आणि ऐशोआरामाचा इतका कडवा विरोध का करत आहेत. ते चॉकलेट आणि सेक्सला एकाच तराजूत का ठेवतात? वासना मरते तेव्हाच माणूस खऱ्या अर्थाने प्रेम करू शकतो, तेव्हाच प्रेम उरते, असा गांधींचा युक्तिवादही होता. हा संवाद बराच वेळ चालला. त्यामुळे गांधींची ऊर्जा संपली होती. गांधी आपल्या जीवनात ब्रह्मचर्याचे पालन करत होते. (फाइल फोटो)
यानंतर सेंगर तिच्या मोहिमेसाठी भारतातील इतर अनेक ठिकाणी गेली. इतर अनेक लोक भेटले. रवींद्रनाथ यांनी त्यांचे मोकळ्या मनाने स्वागत केले. त्या बडोद्याचे महाराज गायकवाड आणि नेहरूंच्या बहिणीच्या पाहुण्याही झाल्या. अखेर त्यांचा सिद्धांत मान्य झाला पण गांधींच्या मृत्यूनंतर. भारत सरकारने देशभरात गर्भनिरोधकांचा प्रचार आणि समर्थन करण्यास सुरुवात केली. भारत हा जगातील पहिला देश बनला ज्याने 1952 मध्ये कुटुंब नियोजन कार्यक्रम सुरू केला. (मार्गारेट सेंगर ब्लॉग)