advertisement
होम / फोटोगॅलरी / Explainer / मानव जातीसाठी धोक्याची घंटा? जगभरात पक्ष्यांची संख्या झपाट्याने कमी होतेय! हे आहे कारण

मानव जातीसाठी धोक्याची घंटा? जगभरात पक्ष्यांची संख्या झपाट्याने कमी होतेय! हे आहे कारण

पर्यावरणीय (Environment) अभ्यासात असे आढळून आले आहे की जगभरातील पक्ष्यांच्या (Birds) लोकसंख्येमध्ये झपाट्याने घट होत आहे, बहुतेक प्रजाती धोक्याच्या टप्प्यात पोहोचल्या आहेत. जर प्रभावी पावले उचलली गेली नाहीत, तर लवकरच मोठ्या प्रमाणावर विनाशाची (mass extinctions) पहिली लाट दिसू शकते. याशिवाय नैसर्गिक जगामध्ये मानवी हस्तक्षेप कमी करावा लागेल, असे या अभ्यासात आढळून आले आहे.

01
अनेक संस्थांनी केलेल्या नवीन अभ्यासात असे आढळून आले आहे की जगभरात पक्ष्यांची संख्या झपाट्याने कमी (Population of Birds) होत आहे. या संशोधनात असे सांगण्यात आले आहे की पक्ष्यांच्या जैवविविधतेला सर्वात मोठा आणि प्रमुख धोका म्हणजे नैसर्गिक अधिवास नष्ट होणे. इतकेच नाही तर या पक्ष्यांच्या घटत्या लोकसंख्येमागे हवामानातील बदल हा प्रमुख घटक म्हणून पुढे येत आहे. (प्रतिकात्मक फोटो: शटरस्टॉक)

02
कॉर्नेल विद्यापीठाचा हा अभ्यास नुकताच पर्यावरण आणि संसाधनांच्या वार्षिक पुनरावलोकनात प्रकाशित झाला आहे. या अभ्यासाचे प्रमुख लेखक अलेक्झेंडर लीज म्हणतात की पक्ष्यांच्या प्रजातींच्या मोठ्या प्रमाणात विलुप्त (Mass Extinction) होण्याच्या नवीन लाटेची सुरुवातीची चिन्हे आता आपण पाहत आहोत. उष्ण कटिबंधात एव्हीयन जैवविविधता (Avian Biodiversity) सर्वाधिक आहे आणि या भागात धोक्यात असलेल्या प्रजातींची संख्या सर्वाधिक आहे. (प्रतिकात्मक फोटो: शटरस्टॉक)

03
या अभ्यासानुसार जगातील एकून प्रजातीपैकी (Birds Species) 48 टक्के पक्षांच्या प्रजाती अशा आहेत, ज्यांची संख्या (Population of Birds) कमी होत आहे. त्याच वेळी, 39 टक्के प्रजातींची संख्या कायम आहे. फक्त सहा प्रजाती आहेत ज्यांची संख्या वाढत आहे आणि 7 टक्के प्रजातींची स्थिती माहित नाही. संशोधकांनी 11,000 पक्ष्यांच्या प्रजातींचा अभ्यास केला आहे. (प्रतिकात्मक फोटो: शटरस्टॉक)

04
ही तपासणी 2019 च्या निकालांप्रमाणेच परिणाम दर्शवत आहे, ज्यामध्ये असे म्हटले आहे की गेल्या 50 वर्षांमध्ये यूएस आणि कॅनडामध्ये सुमारे 3 अब्ज पक्षी गमावले गेले. या अभ्यासातही पक्ष्यांची संख्या (Population of Birds) कमी होण्याचा आणि नंतर त्यांची नामशेष होण्याची चिन्हे आहेत. पक्षी उंचावर पहायला मिळतात, ते पर्यावरणाच्या (Environment) आरोग्याचे संवेदनशील संकेत आहेत. त्यामुळे त्यांची जैवविविधता (Biodiversity) गमावणे म्हणजे मोठ्या प्रमाणावर जैवविविधता नष्ट होणे आणि मानवी आरोग्यासाठी मोठा धोका होय. (प्रतिकात्मक फोटो: शटरस्टॉक)

05
त्यांच्या अभ्यासाच्या निष्कर्षांनंतरही, संशोधकांचे म्हणणे आहे की पक्ष्यांच्या संवर्धनाच्या प्रयत्नांकडून त्यांना मोठ्या अपेक्षा आहेत. पण तरीही मोठ्या बदलाची गरज आहे. लीज स्पष्ट करतात की पक्ष्यांचे भवितव्य त्यांच्या अधिवासाचा ऱ्हास आणि बिघडणे थांबविण्यावर अवलंबून आहे. हे संसाधनांच्या मागणीवर बरेच अवलंबून आहे. वस्तूंच्या वितरणामुळे जैवविविधता नष्ट होण्यास हातभार कसा लागतो याकडे लक्ष द्यावे लागेल. याशिवाय नैसर्गिक जगात मानवी हस्तक्षेप कमी करावा लागेल. (प्रतिकात्मक फोटो: शटरस्टॉक)

  • FIRST PUBLISHED :
  • अनेक संस्थांनी केलेल्या नवीन अभ्यासात असे आढळून आले आहे की जगभरात पक्ष्यांची संख्या झपाट्याने कमी (Population of Birds) होत आहे. या संशोधनात असे सांगण्यात आले आहे की पक्ष्यांच्या जैवविविधतेला सर्वात मोठा आणि प्रमुख धोका म्हणजे नैसर्गिक अधिवास नष्ट होणे. इतकेच नाही तर या पक्ष्यांच्या घटत्या लोकसंख्येमागे हवामानातील बदल हा प्रमुख घटक म्हणून पुढे येत आहे. (प्रतिकात्मक फोटो: शटरस्टॉक)

    MORE
    GALLERIES