'ये जवानी है दिवानी' हा चित्रपट तुफान गाजला होता. तरुणांमध्ये चित्रपटातील गाण्यांची प्रचंड क्रेझ पाहायला मिळाली होती.
रणबीर कपूर,दीपिका पादुकोण,कल्की कोचलीन, आदित्य रॉय कपूर स्टारर या चित्रपटात करिअर,मैत्री आणि प्रेम यांची अनोखी सांगड घालण्यात आली होती.
आता या चित्रपटाला तब्बल १० वर्षे पूर्ण झाली आहेत. काल ३१ मे २०१३ रोजी हा सिनेमा प्रदर्शित झाला होता.
विशेष म्हणजे दीपिका आणि रणबीरसुद्धा सोबत दिसून आले. या चौघांनी टीमसोबत मिळून धम्माल केलेली पाहायला मिळत आहे.
शिवाय दीपिकाने फोटो शेअर करत चित्रपटातील डायलॉग लिहलाय,'यादें मिठाई के डिब्बे की तरह होती है; एक बार खुला तो सिर्फ एक टुकड़ा नहीं खा पाओगे-नैना तलवार''