अभिनेत्री कतरिना कैफ आणि विकी कौशलने नुकताच ख्रिसमस साजरा केला. कतरिनाने ख्रिसमस पार्टीचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. कतरिनाने शेअर केलेल्या फोटोंमुळे सध्या भलतीच चर्चा रंगलेली पहायला मिळतेय. ख्रिसमसच्या पार्टीतील कतरिनाचे फोटो पाहून ती प्रेग्नेंट असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. कतरिनाने शेअर केलेल्या प्रत्येक फोटोंमध्ये ती तिचं बेबी बंप लपवताना दिसत आहेत. कतरिना जाणूनबुजून अशा अॅंगलवर उभी होती की तिचा बेबी बंप दिसू नये, अशा अनेक कमेंट कतरिनाच्या फोटोंवर येत आहे. त्यामुळे कतरिना खरंच प्रेग्नेंट आहे की काय असा प्रश्न चाहत्यांच्या मनात निर्माण झाला आहे. गेल्या बऱ्याच दिवसांपासून कतरिनाच्या प्रेग्रेंसीच्या चर्चा पहायला मिळत आहे. मात्र विकी आणि कतरिनानं यावर आपलं मौन बाळगलं आहे.