विवेक ओबेरॉयने अलिकडेच बॉलिवूड बबलला दिलेल्या मुलाखतीत त्याच्या आयुष्यात आलेल्या वाईट वेळेविषयी सांगितलं.
विवेकनं सांगितलं की, त्याच्या आयुष्यात असाही काळ आला होता की दिड वर्षे त्याच्याकडे काहीच काम नव्हते. तो पूर्णपणे रिकामा होता.
माझ्यामध्ये नकारत्मकता एवढी वाढली होती की, मला काय करावे कळत नव्हते. मला डिप्रेशनमुळे आत्महत्या करण्याचाही विचार येऊन गेला, असं विवेकनं सांगितलं.
विवेक पुढे म्हणाला, या सगळ्यामुळे सुशांत सिंह राजपूतला कोणत्या वेदना झाल्या असतील हे मी समजू शकतो.