बॉलिवूड-साऊथ अभिनेत्री जिनिलिया देशमुख सध्या मराठी चित्रपटातून प्रेक्षकांना भुरळ पाडत आहे. अभिनेत्री सध्या आपल्या 'वेड' चित्रपटामुळे प्रचंड चर्चेत आहे.
जिनिलियाने अभिनेता-पती रितेश देशमुखच्या पहिल्या दिग्दर्शित वेड या सिनेमातून मराठी सिनेसृष्टीत पदार्पण केलं आहे.
'वेड' बॉक्स ऑफिसवर धमाका करत आहे. या चित्रपटाने तब्बल 50 कोटींचा आकडा पार करत नवा रेकॉर्ड केला आहे.
जिनिलिया गेलं एक दशक पडद्यापासून दूर होती. अभिनेत्रीने तब्बल 10 वर्षांनंतर चित्रपटात पुनरागमन केलं आहे.
एका मुलाखती दरम्यान जिनिलियाला वेडनंतर कोणती भूमिका करायला आवडेल असं विचारण्यात आल्यानंतर अभिनेत्रीने दिलेल्या उत्तराचं कौतुक केलं जात आहे.
यावेळी बोलताना जिनिलिया म्हणाली, 'मी आता वयाच्या दुसऱ्या टप्प्यावर पोहोचली आहे. याआधी मी कॉलेज गर्ल लव्हस्टोरीसारख्या भूमिका केल्या आहेत. आणि त्या प्रेक्षकांना पसंतदेखील पडल्या आहेत'.
मात्र आता वयाच्या पस्तीशीनंतर मला त्याच धाटणीच्या भूमिका मिळाव्या असं वाटतं. वयाच्या त्या टप्प्याला साजेशा भूमिका प्रेक्षकांना जास्त जवळच्या वाटतील असं जिनिलिया म्हणाली.