अभिनेता रितेश देशमुख आणि जिनिलिया देशमुख यांच्या 'वेड' चित्रपटाने सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे.
'वेड'च्या निमित्ताने रितेश आणि जिनिलियाने अनेक माध्यमांना मुलाखती दिल्या होत्या. त्यामध्ये त्यांनी आपल्या खाजगी आयुष्यातील काही गोष्टीसुद्धा उघड केल्या आहेत.
राजश्री मराठीला दिलेल्या एका मुलाखतीत रितेशने सांगितलं की, 'मला या इंडस्ट्री मध्ये काम करत 20 वर्षे पूर्ण झाली आहेत'.
मात्र या 20 वर्षांमध्ये एकदासुद्धा माझे आईबाबा सेटवर नाही आले. बाबा होते तेव्हा त्यांनी यायचं ठरवलं असतं तर त्यांचे प्रोटोकॉल सुरक्षा हे सर्व आलं असतं त्यामुळे कामाच्या ठिकाणी अडचण झाली असती. म्हणूनच ते कधी आले नाहीत.
यावर उत्तर देत आईने म्हटलं, कारण तू कधी बोलवलाच नाहीस. अभिनेता म्हणाला आईचं हे उत्तर ऐकून माझ्या मनाला लागलं.
कारण 20 वर्षांत आपण आपल्या आईलाच सेटवर बोलावलं नाही.तर सगळ्याला काय अर्थ आहे. त्यामुळे मी तेव्हा ठरवून टाकलं आईला आपण दिग्दर्शित केलेल्या चित्रपटाच्या सेटवर बोलावयचं. आणि ते वेडच्या निमित्ताने साध्य झाल्याचं रितेश म्हणाला'.