मराठीतील गोड कपल म्हणून सुयश टिळक आणि आयुषी भावेला ओळखलं जातं. आज या जोडप्याने व्हॅलेंटाइन्स डेनिमित्त एक रोमँटिक पोस्ट शेअर करत सर्वांचं लक्ष वेधलं आहे.
आज दोघांनी व्हॅलेंटाइन्सनिमित्त एक फोटो शेअर करत एकमेकांना व्हॅलेंटाइन्स डेच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
या दोघांनी आपल्या इन्स्टाग्रामवर अकाउंटवर एक अंडर वाटर फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये दोघेही लिपलॉक करताना दिसून येत आहेत.
लग्नापूर्वी सुयशचं नाव अभिनेत्री अक्षया देवधरसोबत जोडलं जात होतं. परंतु अचानक आयुषीसोबत साखरपुडा आणि लगेचच लग्न उरकत सुयशने सर्वांनाच चकित केलं होतं.