मराठी बिग बॉसचा विजेता अभिनेता अक्षय केळकर शोनंतरसुद्धा सतत चर्चेत आहे. आज व्हॅलेंटाइन्स डेनिमित्त आपण अक्षयच्या हटके लव्हस्टोरीवर एक नजर टाकूया.
अक्षय केळकरने बिग बॉसच्या घरात आपल्या लेडी लव्हचा उल्लेख केला होता. ज्याला तो रमा या नावाने हाक मारतो.
अक्षयने नुकतंच एका मुलाखतीत सांगितलं होतं की, तो काही वर्षांपूर्वी एका एकांकिकेला गेला होता. त्यावेळी त्याने पहिल्यांदा त्या मुलीला पाहिलं होतं.
त्या एकांकिकेत ती गाणं गात होती. तिचं गाणं आणि ती अक्षयला प्रचंड पसंत पडले होते. अक्षय तेव्हापासून तिला रमा या नावाने बोलावतो. अभिनेत्याने तिच्या खऱ्या नावाचा उलघडा अद्याप केलेला नाहीय.
काही दिवसानंतर अशाच एका कार्यक्रमाला गेलेलं असताना अचानक रमाची आणि तिची पुन्हा एकदा भेट झाली. त्यावेळी त्यांच्यामध्ये संवाद झाला. आणि नंतर दोघेही सोशल मीडियावर बोलू लागले.
अक्षयला ती प्रचंड आवडत होती. त्यामुळे एके दिवशी अक्षयने तिला थेट प्रपोज करुन टाकलं. परंतु तिने अभिनेत्याला नकार दिला. अक्षयने हार न मानता पुन्हा काही दिवसांनी तिला परत विचारलं.
परंतु दुसऱ्यांदासुद्धा रमाने अक्षयला नकार दिला. यांनतर अक्षयने तिसऱ्यांदा विचारायचं धाडस केलं नाही. तेव्हा रमा म्हणाली आपण आयुष्यभर चांगले मित्र राहू.
यावर अक्षयने तिला सांगून टाकलं माझ्याकडे खूप मित्र आहेत. मला गरज नाही मी तुला प्रचंड पसंत करतो. आणि तुझ्यावर माझं प्रेम आहे.
यावेळी रमाने पुढाकार घेत अक्षयचं प्रपोजल मान्य केलं. आणि आता तब्बल ८ वर्षांपासून हे दोघे रिलेशनशिपमध्ये आहेत.