उर्फी जावेदने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत चकित करणारा खुलासा केला आहे. या प्रकरणाचा संबंध अभिनेत्री माधुरी दीक्षितसोबतसुद्धा आहे.
उर्फी जावेदला एका कार्यक्रमात बोलवण्यात आलं होतं. परंतु कार्यक्रमाच्या आदल्या दिवशी तिला फोन करुन तुला निमंत्रण नसल्याचं सांगण्यात आलं.
या प्रकरणामुळे उर्फी जावेद चांगलीच भडकली आहे. विशेष म्हणजे या कार्यक्रमात मुख्य पाहुनी म्हणून माधुरी दीक्षित उपस्थित होती. '
उर्फी म्हणते की, मला त्यांनी कार्यक्रमात बोलावलं. मी त्यासाठी स्वतःला तयार केलं. कपडे डिझाईन केले. इतरही तयारी केली.
परंतु अचानक मला फोन करुन सांगण्यात आलं की, मी माधुरी दीक्षितच्या गेस्ट लिस्टमध्ये नाहीय. या गोष्टीवरुन उर्फी भलतीच भडकली आहे. यावरुन ती आता कंगनाला पाठिंबा देत म्हणत आहे की, तुम्हाला प्रवाहातून एकटं टाकल्यावर कसं वाटतं मला आता समजत आहे. मला हेही कळत आहे की तू इतकी मजबूत कशी झालेस'.