advertisement
होम / फोटोगॅलरी / मनोरंजन / TRP मीटर : जाता जाता 'लागीरं झालं जी'नं मारली बाजी

TRP मीटर : जाता जाता 'लागीरं झालं जी'नं मारली बाजी

TRP Meter, Zee Marathi - नेहमीप्रमाणे टीआरपी रेटिंग आलंय. त्यानुसार कुठली मालिका आणि शो किती लोकप्रिय आहेत, ते पाहा

01
या आठवड्यातल्या TRP रेटिंग्जमध्ये काही वेगळ्या गोष्टी पाहायला मिळाल्या. दर आठवड्याला प्रेक्षकांचा कल बदलंत जातोय.

या आठवड्यातल्या TRP रेटिंग्जमध्ये काही वेगळ्या गोष्टी पाहायला मिळाल्या. दर आठवड्याला प्रेक्षकांचा कल बदलंत जातोय.

advertisement
02
चला हवा येऊ द्या शो टीआरपीमध्ये 5व्या स्थानावर आलाय. मधल्या काही काळात या शोनं वरचं स्थान पटकावलं होतं. गेल्या आठवड्यात शोचं मुख्य आकर्षण होतं सुनील पाल. हल्ली हा शो आठवड्यातले 4 दिवस असतो. पण तरीही TRPमध्ये खालच्या स्थानावर आहे.

03
गेल्या आठवड्यात लागीरं झालं जी मालिकेनं निरोप घेतला. अजिंक्य पाकिस्तानातून परत येतो. शीतलही लष्करात भरती झालीय. मालिकेचा शेवट गोड झाला. इतके दिवस ही मालिका कधीच पहिल्या पाचात नसायची. पण आता संपणार म्हटल्यावर ती चक्क चौथ्या स्थानावर आलीय.

04
टीआरपी रेटिंगमध्ये याही आठवड्यात झी मराठीला कुठलंही चॅनेल स्पर्धा देऊ शकत नाहीय. खरं तर स्टार प्रवाहवरची जीवलगा मालिका, कलर्स मराठीवरचा बिग बाॅस शो नक्कीच वेगळे आहेत. पण तरीही ते पहिल्या पाचात येत नाहीत.

05
गेल्या आठवड्यात 'स्वराज्यरक्षक संभाजी' मालिकेत बऱ्याच घडामोडी घडल्या. मुख्य म्हणजे संभाजी महाराजांना अनाजी पंत आणि कारभाऱ्यांच्या कट कारस्थानांबद्दल कळलं. मालिकेनं तिसरं स्थान पटकावलंय. मालिकांच्या खोट्या गोष्टीत रमणारे प्रेक्षक ऐतिहासिक मालिकाही आवर्जून पाहतात, हे पाहून बरं वाटतं.

06
तुझ्यात जीव रंगला मालिकेतली राणादाची अचानक झालेली एक्झिट प्रेक्षकांच्या काळजाला हात घालणारी ठरली. त्यामुळे ही मालिका आता नंबर 2वर आलीय. मालिका दोन वर्षांनी पुढे सरकणार आहे. राणा राजा बनून येणार. राणाचा मेकओव्हर प्रेक्षकांना किती आवडतो ते कळेलंच.

07
टीआरपीमध्ये नंबर वनवर पुन्हा एकदा माझ्या नवऱ्याची बायको आहे. गुरूचं विसरण्याचं नाटक, राधिकाला येणारी शंका, शनायाची नौटंकी तशीच सुरू आहे आणि प्रेक्षक आवडीनं पाहतातयत. तुला पाहते रे मालिका मात्र यावेळी पहिल्या पाचातही नाही. पुनर्जन्म वगैरे प्रेक्षकांच्या फार पचनी पडत नसल्याचं दिसतंय.

  • FIRST PUBLISHED :
  • या आठवड्यातल्या TRP रेटिंग्जमध्ये काही वेगळ्या गोष्टी पाहायला मिळाल्या. दर आठवड्याला प्रेक्षकांचा कल बदलंत जातोय.

    MORE
    GALLERIES