

या आठवड्याच्या एकीकडे अभिजीत आसावरीचं नवं आयुष्य सुरु झालं आहे. तर दुसरीकडे गुरुच्या आयुष्यात नव्या शनायाची एंट्री झाली आहे. त्यामुळे TRP मीटरमध्ये सध्या वेगवेगळे चढउतार पाहायला मिळत आहेत.


झी मराठीच्या 'अग्गबाई सासूबाई' या मालिकेच्या टीआरपीमध्ये घसरण झाली असून ही मालिका आता पाचव्या स्थानवर आहे. आसावरी-अभिजीतच्या नव्या आयुष्याची सुरुवात झाली असून ते दोघं पहिल्यांदाच बाहेर फिरायला गेले आहेत. मात्र त्या ठिकाणी आसावरी हरवते


झी मराठीची लोकप्रिय मालिका 'स्वराज्य रक्षक संभाजी' आता हळूहळू शेवटाकडे वळत आहे. औरंगजेबाचा सरदार मुकर्रबखान संभाजी महाराजांना पकडून आणण्याचं वचन बादशहाला देतो आणि तशी सर्व तयारीही त्यानं केली आहे. ही मालिका या आठवड्यात चौथ्या स्थानावर आहे.


या आठवड्याच्या TRP रेटिंगमध्ये झी मराठीची 'लग्नाची वाईफ वेडिंगची बायको' मालिकाच्या रेटिंगमध्ये वाढ झाली असून ही मालिका आता तिसऱ्या स्थानावर आहे. सध्या या मालिकेत सवतीमधील स्पर्धा त्यामुळे मदनची उडणारी तारांबळ पाहायला मिळत आहे.


कॉमेडी शो 'चला हवा येऊ द्या' सेलिब्रेटी पॅटर्नमुळे सध्या खूप चर्चेत आहेत. TRP रेटिंगमध्ये 'चला हवा येऊ द्या'नं चौथ्या स्थानावर वरून दुसऱ्या स्थानावर झेप घेतली आहे.


मागच्या आठवड्यात तिसऱ्या स्थानावर असलेल्या माझ्या नवऱ्याची बायको या मालिकानं पुन्हा एकदा टीआरपी लिस्टमध्ये अव्वल स्थानावर भरारी घेतली. या मालिकेतील माया या नव्या पात्रात एक वेगळीच रंगत आणली आहे.