गेल्या आठवड्यात चला हवा येऊ दे हा शो पहिल्या पाचमध्येही नव्हता. अगोदरच्या अनेक आठवड्यात नंबर पाचवर असलेल्या या शोला जागो मोहन प्यारे या मालिकेनं धक्का मारला होता. पण आता पुन्हा 'हवा'नं आपलं स्थान परत मिळवलं आहे. गेल्या आठवड्यात सैराटचं केलेलं नाट्य भारी होतं. विशेषत: डाॅ. निलेश साबळेंनी साकारलेले नागराज मंजुळे आणि श्रेया बुगडेची सई ताम्हणकर लोटपोट हसवून गेली.
...आणि अॅवाॅर्ड गोज टु 'तुला पाहते रे'. विक्रांत आणि ईशाच्या प्रेमाची रस्सीखेच पाहायला प्रेक्षकांना आवडतेय. सुबोध भावे आणि गायत्री दातार म्हणजेच विक्रांत सरंजामे आणि ईशा यांची केमिस्ट्री टीआरपी रेटिंगमध्ये चांगलीच जाणवलीय. 'तुला पाहते रे' या आठवड्यात अनेकांनी पाहिलीय. ही मालिका नंबर वनवर आलीय. विक्रांत आणि ईशाच्या लव्ह स्टोरीत पुढे काय होतंय, हे पाहण्याची सगळ्यांनाच उत्सुकता वाटतेय. पुन्हा चाळ ते काॅर्पोरेट आॅफिस ते आलिशान बंगला ही सगळी सफर प्रेक्षकांना आवडतेय, असं वाटतं.