कलाकारांवर नेटकरी सतत लक्ष ठेवून असतात. कोणत्याही अभिनेता किंवा अभिनेत्रीने एखादा फोटो शेअर केला कि तो क्षणार्धात व्हायरल होतो.
टीनाने नुकतंच आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर आपले काही फोटो शेअर केले होते. हे फोटो पाहून नेटकरी मजेशीर कमेंट्स करत आहेत.
आजही अभिनेत्रीनं आपलं हटके फोटोशूट केलं आहे. यामध्ये ती चक्क मार्केटमध्ये बसून भाजीपाला विकताना दिसून येत आहे.
अभिनेत्रीने फक्त फोटोशूटसाठी हे केलं होतं, मात्र आता सोशल मीडियावर तिला विविध कमेंट्स पाहायला मिळत आहेत.
एकाने कमेंट करत लिहलंय, 'अभिनय सोडून हे काम कधी सुरु केला?'तर दुसर्याने लिहलंय, 'मला सगळ्या भाज्या अर्ध्या अर्ध्या किलो द्या'. अशा अनेक मजेशीर कमेंट्स या फोटोंवर येत आहेत.
टीना दत्ता 'उतरन' या मालिकेतून घराघरात पोहोचली होती. यामध्ये तिने ईच्छा ही व्यक्तिरेखा साकारली होती.