मराठी सिनेसृष्टीतील अतिशय लोकप्रिय आणि गुणी अभिनेत्री म्हणजे तेजस्विनी पंडित होय.
2/ 8
तेजस्विनी पंडित अभिनयानंतर आता 'बांबू' सिनेमाच्या माध्यमातून निर्मिती क्षेत्रात पाऊल ठेवत आहे.
3/ 8
दरम्यान अभिनेत्रीने एका माध्यमाला मुलाखत दिली होती. यामध्ये तिने आपल्या खाजगी आयुष्यातील एका मोठ्या गोष्टीचा खुलासा केला आहे. पाहूया अभिनेत्री नेमकं काय म्हणाली.
4/ 8
वडापाव आणि मुंबई यांचं एक खास नातं आहे. अनेक लोक तीन वेळचं जेवण म्हणून वडापाव खाऊ शकतात. सर्वसामान्य लोकांपासून ते सेलेब्रेटींपर्यंत सर्वजण चवीने वडापाव खाताना दिसतात.
5/ 8
तेजस्विनीने प्लॅनेट मराठीच्या या मुलाखतीमध्ये खुलासा करत सांगितलं की तिने काही वर्षांपूर्वी वडापाव खाणं सोडून दिलं आहे.
6/ 8
अभिनेत्रीने पुढे सांगितलं की, तिने आपल्या एका मित्रासाठी वडापाव खाणं सोडलं आहे, कारण तो मित्र आता या जगात नाहीय. अभिनेत्रीच्या या खुलाश्याने सर्वच भावुक होत आहेत.
7/ 8
तेजस्विनी सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. ती सतत आपले फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते.
8/ 8
तेजस्विनीच्या चाहत्यांना तिच्या प्रत्येक पोस्टची भुरळ पडत असते.