'तारक मेहता का उल्टा चष्मा' हा शो छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय शो आहे. तब्बल 14 वर्षांपासून हा शो प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे.
या शोमधील जेठालाल, दयाबेन ते तारक मेहता अशा सर्वच व्यक्तिरेखा तुफान लोकप्रिय ठरल्या आहेत. दरम्यान दयाबेन आणि तारक मेहता अर्थातच दिशा वकानी आणि शैलेश लोढा यांनी या शोमधून एक्झिट घेतली आहे.
तारक मेहता साकारणाऱ्या शैलेश लोढा यांनी अंतर्गत वादामुळे हा शो सोडला होत. मात्र आता हे प्रकरण चांगलंच तापलं आहे.
शैलेश लोढा यांनी शोचे निर्माते असित मोदींवर आपली वर्षाची फी न दिल्याचं आरोप केला होता. याबाबत सतत अनेक बातम्या समोर येत होत्या.
दरम्यान आता शैलेश लोढा यांनी कायदेशीर पद्धतीने या प्रकरणात पुढे जाण्याचा निर्णय घेतला असल्याचं समोर येत आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, शैलेश लोढा यांनी निर्माते असित मोदींविरोधात कोर्टात धाव घेतली आहे. त्यांनी निर्मात्यांविरोधात तक्रार दाखल केली आहे.
आज तकच्या रिपोर्ट्सनुसार, शैलेश लोढा यांनी मार्चमध्येच तक्रार दाखल केली आहे. आता मे ,महिन्यात या प्रकरणावर सुनावणी होणार आहे. आता हे प्रकरण नेमकं कोणतं वळण घेतं पाहणं महत्वाचं ठरणार आहे.