स्वरा भास्कर नेहमीच विविध गोष्टींमुळे चर्चेत असते. बऱ्याचवेळा ती आपल्या रोखठोक स्वभावामुळे नेटकऱ्यांच्या निशाण्यावर येत असते.
दरम्यान आता पुन्हा एकदा असंच काहीसं झालं आहे. कालपासून सोशल मीडियावर एक बातमी प्रचंड व्हायरल होत आहे.
ही बातमी म्हणजे अभिनेत्री स्वरा भास्कर लग्नाच्या अवघ्या चार महिन्यात आपल्या बाळाला जन्म देणार आहे.
ज्या न्यूज पोर्टलच्या नावाने ही बातमी फिरत होती. त्या पोर्टलने आता आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरुन या बातमीला पूर्णपणे अफवा असल्याचं सांगितलं आहे.
या पोर्टलने आपण अशी कोणतीही माहिती दिलेली नसून हा ट्विट खोटा असल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे स्वरा अद्याप तरी प्रेग्नेंट नाहीय.