स्वरा भास्करने इंस्टाग्राम आणि ट्विटरवर आपले काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये, अभिनेत्रीने तिच्या पतीच्या खऱ्या पत्नीला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. अभिनेत्रीने शेअर केलेल्या या फोटोंमध्ये फहादची पहिली पत्नी म्हणजेच त्याचा खास मित्र अरिश कमर दिसत आहे.अभिनेत्रीने मजेत त्याला आपली सवत म्हटलं आहे.
फोटो शेअर करत अभिनेत्रीने एक मजेशीर कॅप्शन लिहिलं आहे. तिने लिहलंय, 'आमचा मित्र, कॉम्रेड आणि फहदच्या आयुष्याचा खरा जोडीदार अरिश कमर याला वाढदिवसाच्या शुभेच्छा. आम्हाला नेहमी पाठिंबा दिल्याबद्दल आणि सुरुवातीपासूनच एकत्र राहिल्याबद्दल, आमचे न्यायालयीन कागदपत्रे वेळेवर सादर केल्याबद्दल, आमच्या नातेसंबंधाची साक्ष दिल्याबद्दल आणि आतापर्यंतची सर्वोत्तम 'सवत' असल्याबद्दल धन्यवाद'.