

अभिनेत्री सनी लिओनी बॉलिवूड सिनेसृष्टीतील नावाजलेलं नाव आहे. तिच्या सिनेमांची आणि प्रोजेक्टची जेवढी चर्चा होते तेवढीच किंबहूना त्याहून जास्त चर्चा तिच्या खासगी आयुष्याविषयी होते. याचमुळे गूगल सर्चमध्ये सर्वात जास्त सर्च केल्या जाणाऱ्या अभिनेत्रींमध्ये तिचं नाव येतं.


आतापर्यंत अनेकांना सनी लिओनीच्या भूतकाळाबद्दल आणि तिच्या कुटुंबाबद्दल इंत्तभूत माहिती आहे. तिचे कट्टर चाहते तर तिच्याबद्दलची एकही गोष्ट जाणून घेतल्यावाचून राहत नाहीत. पण आज आम्ही तुम्हाला तिच्या आजाराबद्दल सांगणार आहोत. एक असा आजार ज्याबद्दल फारसं कोणाला माहितीच नाहीये.


सनीची एक अशी सवय आहे ज्याच्यासाठी ती कोणाचीही पर्वा करत नाही. तिच्या या सवयीचा खुलासा जिस्म २ सिनेमाच्या सेटवर झाला होता. तिची ही विचित्र सवय जेव्हा इतरांना कळली तेव्हा काहींचा तर विश्वासच बसला नाही. कारण तिच्या याच सवयीमुळे ती नेहमी सेटवर उशीरा यायची.


आता तुम्हीही तिला नेमकी कोणता आजार झालाय याचा विचार करत असाल तर जरा थांबा. सनीला सतत पाय धुण्याची सवय आहे. काहींना जसं दर काही मिनिटांनी हात धुण्याची सवय असते तसेच सनीला काही वेळाने पाय धुवायचे असतात.