लोकप्रिय साऊथ स्टार विजय देवरकोंडा कायमच चर्चेत असतो. मात्र यावेळी तो एक खास कारणासाठी चर्चेचा विषय ठरत आहे.
विजयने आपल्या शरिरातील सर्व अवयव दान करणार असल्याची घोषणा केली आहे. आज तकच्या वृत्तानुसार विजयने एका वैद्यकिय कार्यक्रमात ही घोषणा केली.
विजय देवरकोंडा नुकताच अवयवदानाला प्रोत्साहन देण्यासाठी एका कार्यक्रमात सहभागी झाला होता. जिथे त्याने अवयवदानाबाबत सविस्तर चर्चा केली.
अवयव दान करण्याबाबत विजय म्हणाला, 'मला वाटते मी माझे सर्व अवयव दान करेन. मी गेल्यानंतर इतर कोणाला त्याचा उपयोग झाला आणि त्यांना जगण्यास मदत झाली तर मला ते आवडेल. माझे अवयव वाया घालवून काही उपयोग आहे.'
'मी तंदुरुस्त राहतो आणि स्वतःला निरोगी ठेवतो. मी आणि माझ्या आईने आमचे अवयव दान करण्यासाठी नोंदणी केली आहे', असंही विजयने सांगितलं.
'तू आमचे हृदय जिंकले, तूझे विचार लोकांसाठी प्रेरणा देणारे आहेत', अशा अनेक प्रतिक्रिया विजय देवरकोंडाविषयी येत आहेत.