दाक्षिणात्य फिल्ममेकर रवींद्र चंद्रशेखर यांनी अभिनेत्री महालक्ष्मीसोबत लग्नगाठ बांधली. गुरुवारी दोघांनी लग्नगाठ बांधली असून सध्या त्यांचे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होताना दिसत आहे.
रवी आणि महालक्ष्मी यांचा विवाह पारंपारिक पद्धतीने पारंपारिक पद्धतीने दक्षिण विधी पद्धतीने पार पडला. अभिनेत्री महालक्ष्मीने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम हँडलवर तिच्या लग्नाचे जबरदस्त फोटो शेअर केले आहेत.
महालक्ष्मीने कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, मी खूप भाग्यवान आहे की तू माझ्या आयुष्याचा एक भाग बनला आहेस. तुझ्या प्रेमाने माझ्या आयुष्यात वेगळाच रंग भरला आहे. माझ्याकडून तुम्हाला खूप खूप प्रेम आणि नवीन आयुष्याची सुरुवात.
छायाचित्रांमध्ये महालक्ष्मी आणि रवी पारंपरिक लूकमध्ये दिसत असल्याचे तुम्ही पाहू शकता. तसेच या दोन्ही जोडप्यांच्या चेहऱ्यावर लग्नाचा आनंद स्पष्ट दिसत आहे.
महालक्ष्मीचं यापूर्वीही पहिलं लग्न झालं होतं. तिनं अनिल यांच्याशी लग्न केलं होतं. पहिल्या लग्नापासून महालक्ष्मीला एक मुलगा देखील आहे.
पैशासाठी लग्न केलं असल्याचं अनेकजण म्हणत आहेत. त्यामुळे सध्या दोघेही मोठ्या प्रमाणावर चर्चेत आहेत.