बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूर चित्रपटांपेक्षा जास्त आपल्या खाजगी आयुष्यामुळे चर्चेत असते. अभिनेत्री सतत काही ना काही गोष्टी शेअर करुन सर्वांचं लक्ष वेधत असते.
सोनम कपूर सध्या चित्रपटांपासून दूर असली तरी ती सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून अभिनेत्री चाहत्यांना आपल्या प्रत्येक अपडेट्स देत असते.
सोनम कपूरने आपल्या मुलाचं नाव 'वायू' असं ठेवलं आहे. अभिनेत्रीच्या मुलाच्या नावाची जोरदार चर्चा झाली होती.
दरम्यान अनेक चाहते सोनम कपूरच्या मुलाला पाहण्यासाठी उत्सुक आहेत, परंतु अभिनेत्रीने अद्याप वायूचा एकही फोटो शेअर केलेला नाहीय.
सोनम कपूरने पीटीआय वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत वायूचा फोटो कधी शेअर करणार याबाबत खुलासा केला आहे.
यावेळी बोलताना सोनम म्हणाली, 'वायू मोठा झाल्यानंतर मी फोटो शेअर करेन कदाचित... किंवा जेव्हा तो स्वतः हा निर्णय घेईल'. अर्थातच सोनमच्या मुलाला पाहण्यासाठी अद्याप काही काळ प्रतीक्षा करावी लागणार आहे.