कपाळावर गडद चंद्रकोर, डोळ्यात स्वाभिमान, हातात तलवार अशा मराठमोळ्या लूकमध्ये सोनाली फारच सुंदर दिसत आहे.
अभिनेत्रीने हे फोटो शेअर करत सुंदर कॅप्शनसुद्धा लिहलं आहे. कॅप्शन वाचून अंगावर शहारा आल्याशिवाय रहाणार नाही.
सोनालीने लिहलंय, 'भाळी सौभाग्याचा केशरी तिलक मिरवावा इथेच घ्यावा जन्म पुन्हा इथे मृत्यू यावाआई तुझ्याच कारणी देह माझा पडावा मराठा तितुका मेळवावा….महाराष्ट्र धर्म वाढवावा''