बिग बॉस मराठी फेम अभिनेत्री आणि शिव ठाकरेची एक्स गर्लफ्रेंड वीणा जगतापने नुकतंच एक गुड न्यूज शेअर केली आहे.
वीणाने आपल्या नव्या कारसोबतच फोटो शेअर करत आपल्या कुटुंबात आणखी एका नव्या सदस्याची एन्ट्री झाल्याचं म्हटलं आहे.
'बिग बॉस मराठी'च्या दुसऱ्या पर्वामुळे वीणा प्रचंड चर्चेत आली होती. याच घरात शिव आणि वीणा प्रेमात पडले होते. मात्र आता त्यांचा ब्रेकअप झाला आहे.