कलर्स मराठी वाहिनीवरील अनेक मालिका कायमच चर्चेत असतात. काही महिन्यांपूर्वी कलर्स मराठीवर ‘शेतकरी नवरा हवा’ ही मालिका सुरु झाली आहे. या मालिकेनं नुकताच 100 भागाचा टप्पा पूर्ण केला आहे.
शेतीविषयी विशेष प्रेम असलेला सुशिक्षित, समजूतदार, देखणा असा सयाजी. सयाजीचे ध्येय लहानपणापासून ठरलेलं आहे, आजोबांना दिलेले वचन पूर्ण करण्यासाठी त्याने सुरुवातीपासून आपले सर्वस्व शेतीसाठी पणाला लावले. अॅग्रीकल्चर (मध्ये आपले शिक्षण पूर्ण केले. शेतीला पुन्हा सोन्याचे दिवस आणायचे हा त्याचा ठाम निर्धार आहे.
दुसरीकडे आधुनिकतेचा वसा जपणारी, कॉर्पोरेट जगात वावरणारी रेवा. या दोघांची कहाणी प्रेक्षकांना देखील आवडतं आहे. आता मालिकेनं 100 भागाचा टप्पा पूर्ण केलं आहे.