'बिग बॉस'फेम अभिनेत्री-पंजाबी गायिका शहनाज गिल सध्या आपल्या बॉलिवूड डेब्यूमुळे चर्चेत आहे. अभिनेत्री लवकरच सलमान खानच्या आगामी 'किसिका भाई किसीकी जान' चित्रपटात झळकणार आहे. दरम्यान शहनाज गिल आपल्या खाजगी आयुष्यामुळेही चर्चेत आली आहे. नुकतंच अभिनेत्रीने आपल्या युट्युब शोमध्ये आपण नवं घर खरेदी केल्याचं म्हटलं आहे. शहनाजने सांगितलं मी सेव्हिंगसाठी आणि पैसे मिळवण्यासाठी स्वतः चा युट्युब शो सुरु केला आहे. शहनाजच्या या शोचं नाव ''देसी वाइब्स विथ शहनाज गिल' असं आहे. यामध्ये आत्तापर्यंत शाहिद कपूर, आयुषमान खुराना,विकी कौशल यांसारखे अनेक मोठे कलाकार सहभागी झाले होते. तर या लेटेस्ट एपिसोडमध्ये युट्युबर भुवन बाम सहभागी झाला होता.