बॉलिवूड किंग म्हणून ओळखला जाणाऱ्या अभिनेता शाहरुख खानची लेक सुहाना खान लवकरच बॉलिवूड डेब्यू करणार आहे. झोया अख्तरच्या 'द आर्चिज' या सिनेमातून ती बॉलिवूड एन्ट्री करणार आहे.
लेकीनंतर शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान बॉलिवूडमध्ये डेब्यू कधी करणार याची सर्वांनाच उत्सुकता लागून आहे. आर्यन खानच्या डेब्यूबाबत एक वृत्त समोर आलं आहे. पाहूया काय आहे.
मात्र या दोघांच्या चाहत्यांनी एक फोटो शेअर करत सर्वांनाच आनंदी केलं आहे. हा फोटो सध्या चांगलाच चर्चेत आला आहे.
काही वेळेपूर्वी सोशल मीडियावर आर्यन खानचा एक फोटो शेअर करत तो 'ब्रह्मास्त्र 2' मध्ये दिसणार असल्याचं सांगण्यात आलं आहे.
या फोटोमध्ये आर्यन खान वानरास्त्रच्या रुपात दिसून येत आहे. हा फोटो समोर येताच चर्चेचा विषय ठरला आहे.