दिग्दर्शक-अभिनेते नागराज मंजुळे यांच्या 'सैराट' या सिनेमाने मराठी सिनेसृष्टीला एक नवी ओळख मिळवून दिली आहे. या चित्रपटातील आर्ची आणि परश्याची हटके केमेस्ट्री तुफान गाजली होती. या कलाकारांना लोकांनी अक्षरशः डोक्यावर घेतलं होतं. आजही त्यांची जादू कायम आहे. सैराटमध्ये अभिनेत्री रिंकू राजगुरूने आर्चीची तर आकाश ठोसरने परश्याची मुख्य भूमिका साकारली होती. मात्र आर्चीच्या भूमिकेसाठी आधी खूप मुलींचे ऑडिशन घेण्यात आले होते. नुकतंच एका मुलाखतीमध्ये अभिनेत्री सायली पाटीलने खुलासा करत सांगितलं की, आर्चीच्या भूमिकेसाठी जवळजवळ तिची निवड झालीच होती. सायलीने सांगितलं की, तीने ठरवून नव्हे तर अपघाताने सैराटची ऑडिशन दिली होती. तेव्हा ती कॉलेजदमध्ये होती. सायलीने सांगितलं की, तिला काम करायचं नव्हतं. याबाबत तिने नागराज मंजुळेंनाही सांगितलं. त्यांनतर पुढे आणखी मुलींचे ऑडिशन घेण्यात आले होते. सायली पाटील लवकरच नागराज मंजुळेंच्या 'घर बंदूक बिर्यानी'मध्ये आकाश ठोसरसोबत झळकणार आहे.