बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान आणि अभिनेता विकी कौशल लवकरच मोठ्या पडद्यावर रोमान्स करताना दिसून येणार आहेत. या दोघांचा 'जरा बचके जरा हटके' हा बहुचर्चित सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. सारा आणि विकी या चित्रपटाचं जोरदार प्रमोशन करत आहेत. यादरम्यान अनेक शहरांना भेटी देत आहेत. नुकतंच सारा आणि विकी राजस्थानमध्ये पोहोचले होते. याठिकाणचे फोटो दोघांनी शेअर केले आहेत. विशेष म्हणजे या दोघांनी तब्बल १७० लोक असणाऱ्या सर्वात मोठ्या कुटुंबाची भेट घेतली. यावेळी दोघांनी त्यांच्या चुलीवर बनलेल्या भाकरी आणि चविष्ट भेंडीचा आस्वाद घेतला. तसेच त्यांच्यासोबत पारंपरिक राजस्थानी गाण्यांचादेखील आनंद घेतला.