बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान आणि अभिनेत्री अमृता सिंग यांची लेक सारा अली खानने फारच कमी वेळेत बॉलिवूडमध्ये चांगला जम बसवला आहे.
एक स्टारकीड असूनसुद्धा सारा अली खानने आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. अभिनेत्रीने अनेक चांगले सिनेमे इंडस्ट्रीला दिले आहेत.
दरम्यान नुकतंच दिलेल्या एका मुलाखतीत सारा अली खानने आपल्या ब्रेकअप आणि त्यांनतर आलेल्या वाईट काळाबाबत खुलासा केला आहे.
साराने नुकतंच एका पॉडकास्ट शोमध्ये सांगितलं की, 2020 हे वर्ष तिच्या आयुष्यातील सगळ्यात वाईट वर्षांपैकी एक होतं.
याकाळात आपल्यावर ट्रोलिंगचाही परिणाम झाला नसल्याचं सारा म्हणते,कारण आपण आपल्या दुःखात असतो. आपल्या आत दुःखाचा ज्वालामुखी उसळलेला असताना इंटरनेटवर काय सुरूय याचं आपल्याला काही घेणं देणं नसतं.असं अभिनेत्री म्हणाली.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, 'लव्ह आज कल 2' च्या सेटवर सारा आणि कार्तिक प्रेमात पडले होते. परंतु चित्रपट रिलीज होईपर्यंत त्यांचा ब्रेकअप झाला.त्यांनतर त्यांनी एकेमकांना पाहणंही टाळलं होतं.