शाहरुख खानची मुलगी सुहाना खान ते अजय देवगण आणि काजोलची लाडकी लेक न्यासा देवगणपर्यंत अनेक स्टारकिड्स नेहमीच चर्चेत असतात. बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवण्यापूर्वीच या स्टारकिड्सचे सोशल मीडियावर प्रचंड चाहते आहेत.
तर दुसरीकडे काही स्टारकिड्स असे आहेत जे लाइमलाइटपासून दूर राहण पसंत करतात.यातीलच एक स्टारकिड्स म्हणजे अभिनेता संजय दत्तची मुले होय.
शहरान हा संजय दत्त आणि मान्यता दत्त यांचा मुलगा आहे. मान्यता दत्त अभिनेत्याची तिसरी पत्नी आहे आणि या लग्नापासून संजय दत्तला दोन अपत्ये आहेत.
संजय दत्तची मुलं नेहमीच प्रसिद्धीपासून दूर राहतात. पण अभिनेता त्याच्या मुलांचे आणि त्याच्या कुटुंबाचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतो.
संजय दत्तच्या मुलाचे फोटो पाहिल्यानंतर हा स्टारकिडसुद्धा मोठा होऊन वडिलांच्या पावलावर पाऊल टाकेल असा अंदाज वर्तविला जात आहे.