मीडिया रिपोर्टनुसार, समांथानं हैद्राबादमध्ये 3BHK डुप्लेक्स खरेदी केला आहे. हैद्राबादच्या जयभेरी ऑरेंज काऊंटी या प्रसिद्ध ठिकाणी असलेल्या एका इमारतीत तिनं घर खरेदी केलंय.
समांथाचं नवं घर हे 13 आणि 14व्या माळ्यावर आहे. रियल इस्टेड डेटा एनालिटिक्स कंपनी सीआरई मॅट्रिक्सनं दिलेल्या माहितीनुसार, समांथाच्या हैद्राबादच्या घरात पार्कंग स्लॉट देखील आहे.
अभिनेत्रीच्या घराच्या डिटेल्सबद्दल जाणून घेताना समोर आलं की, समांथाचं हे घर 7844 फूटांचं आहे. ज्यात 13व्या मजल्यावर 3920 स्वेअर फुटचा एरिया आहे तर 14व्या मजल्यावर 4024 स्वेअर फुटचा एरिया आहे.
समांथानं स्टार जुबली हिल्स येथे आधीच एक घर थरेदी केलं होतं. जिथे ती एक्स नवरा नागा चैतन्यबरोबर राहत होती.
घटस्फोटानंतर 2021पासून समांथा तिच्या 2 पाळीव श्वानांबरोबर त्या घरात राहत आहे. या घरासाठी तिनं 100 कोटी रुपये मोजले होते असं देखील म्हटलं जातं.
समांथानं 2023च्या सुरूवातीला मुंबईत देखील एक आलिशान घर खरेदी केल्याचं म्हटलं जातंय. तिचं हे घर 3BHK आहे.
या घरासाठी तिनं 15 कोटी रुपये मोजलेत. तिच्या या घराची अधिकृत माहिती नाही पण मुंबईतील घरामुळे समांथा चर्चेत आली होती.