साऊथ सुंदरी समंथा रुथ प्रभू गेल्या अनेक दिवसांपासून आपल्या आजारपणामुळे चर्चेत आली होती. आता अभिनेत्रीची प्रकृती उत्तम असून ती पडद्यावर झळकण्याची सज्ज आहे. तिचे एकापाठोपाठ एक अनेक सिनेमे रिलीज होण्याचा मार्गावर आहेत. दरम्यान अभिनेत्री पुन्हा एकदा आपल्या खाजगी आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. समंथा रुथ प्रभूने नुकतंच मुंबईत आलिशान घर खरेदी केल्याचं समोर आलं आहे. समंथा प्रभूने याबाबत कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नसली तरी मीडिया रिपोर्ट्सनुसार अभिनेत्रीने नवं घर घेतलं आहे. समंथाने मुंबईच्या उच्चभ्रू इलाक्यात आलिशान सी फेसिंग थ्री बेडरुम फ्लॅट खरेदी केलं आहे. रिपोर्ट्सनुसार या आलिशान घराची किंमत तब्बल 15 कोटी रुपये इतकी आहे. समंथाने मुंबईत घर खरेदी केल्याने अभिनेत्री लवकरच मुंबईत शिफ्ट होणार असल्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत.