सलमान खान आणि ऐश्वर्या राय यांचा भूतकाळ जवळजवळ सर्वांनाच माहितेय. आपल्या ब्रेकअपनंतर सलमान आणि ऐश्वर्या कधीही पडद्यावर एकत्र दिसून आले नाहीत. परंतु आता सलमान खान आणि ऐश्वर्या राय इतक्या वर्षांनंतर आमनेसामने आले आहेत. अनेकांना वाटत असेल की, हे नेमकं कसं घडलं? तर याबाबत आम्ही तुम्हाला सांगतो. सांगायचं तर सलमान खानचा 'किसी का भाई किसी की जान' हा सिनेमा आधीच रिलीज झाला आहे. दरम्यान आज ऐश्वर्या रायचा साऊथ सिनेमा 'पोन्नियन सेल्व्हन' रिलीज झाला आहे. त्यामुळे इतक्या वर्षानंतर आता सलमान खान आणि ऐश्वर्या राय बॉक्स ऑफिसवर आमनेसामने आले आहेत. सलमान खानच्या सिनेमावर ऐश्वर्या रायचा सिनेमा वरचढ ठरणार का असा अंदाज वर्तवला जात आहे.