मराठी सिनेसृष्टीतील बोल्ड आणि बिनधास्त अभिनेत्री म्हणून सई ताम्हणकरला ओळखलं जातं. सई सतत ग्लॅमरस फोटोशूट करत असते.
2/ 8
सई ताम्हणकर सोशल मीडियावरदेखील प्रचंड सक्रिय असते. अभिनेत्री आपले फोटो आणि व्हिडीओ शेअर करत सर्वांचं लक्ष वेधून घेत असते.
3/ 8
नुकतंच सई ताम्हणकरने काळ्या रंगाच्या हायस्लिट ड्रेसमध्ये एक जबरदस्त फोटोशूट केलं आहे यामध्ये अभिनेत्रीने दिलेल्या हटके पोझवर आता मिम्सचा पाऊस पडताना दिसून येत आहे.
4/ 8
सई ताम्हणकरने स्वतः आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर हे मिम्स शेअर केले आहेत. भाडीपाने सईच्या या पोझचा मिम्स तयार करत लिहलंय, 'पडलेले पैसे गुपचूप उचलताना मी'.
5/ 8
तर सईने पुणे टाइम्स ऑनलाईनचा मिम्स शेअर केला आहे त्यावर लिहलंय, मी कधी झोपणार असा विचार करत असताना माझा रूममेट .. भावा लाईट बंद कर ना'.
6/ 8
सई ताम्हणकरने पर्पल मराठीचा एक मिम शेअर केला आहे त्यावर लिहलंय, लेग्स वर्कआउट केल्याअंतर दुसऱ्या दिवशी मी'.
7/ 8
तर आणखी एका फोटोमध्ये अभिनेत्रींच्या या फोटोची तुलना क्रिकेटर युजवेंद्र चहलच्या एका फोटोसोबत करण्यात आली आहे. हे मिम्स आणि सईचे फोटो सध्या चांगलेच व्हायरल होत आहेत.
8/ 8
सई ताम्हणकर या काळ्या रंगाच्या वेस्टर्न ड्रेसमध्ये फारच ग्लॅमरस दिसत आहे, अभिनेत्रीच्या चाहत्यांना तिचा हा लुक फारच पसंत पडला आहे.