सध्या सगळीकडे दिवाळीची लगबग पहायला मिळत आहे. दिवाळीच्या मुहुर्तावर सगळेजण खास फोटो शेअर करत आहे. अशातच मराठमोळ्या सईनंही खास फोटोशूट केलं आहे.
सईनं फोटो शेअर केल्यानंतर काही क्षणातच हे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होताना पहायला मिळाले.
'शुक्राची चांदणी, आता नजर लागेल, हास्य टॅानिक, खूपच छान', अशा भरभरुन कमेंट सईच्या या पोस्टवर येत आहे.
सई नेहमीच ट्रॅडिशनल आणि वेस्टर्न अंदाजात फोटोशूट करत असते. तिच्या फोटो आणि व्हिडिओंवर चाहते भरभरुन लाईक्स आणि कमेंट्स करत असतात.
आपल्या बोल्ड आणि बिनधास्त स्वभावासाठी मराठी अभिनेत्री सई ताम्हणकर ओळखली जाते. सईने मराठी चित्रपट, नाटक, हिंदी चित्रपट, वेबसीरिज अशा प्रत्येक क्षेत्रात आपला ठसा उठवला आहे.
सध्या 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या कॉमेडी शोमधून सई ताम्हणकर परीक्षकाच्या भूमिकेत प्रेक्षकांना भेटत असते.