मराठीतील दिग्गज कलाकार म्हणून सचिन पिळगांवकर आणि सुप्रिया पिळगांवकर यांना ओळखलं जातं. सचिन-सुप्रियांच्या पाऊलावर पाऊल ठेवत त्यांची लेक श्रियानेसुद्धा मनोरंजनसृष्टीत आपलं करिअर बनवलं आहे. श्रियाने मराठी-हिंदी सिनेमांपासून वेबसीरिजपर्यंत प्रत्येक क्षेत्रात स्वतःला सिद्ध केलं आहे. नुकतंच श्रियाने आपला वाढदिवस साजरा केला. या दिवसाचे काही खास फोटो तिने आपल्या इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. या फोटोंवरुन श्रियाने आपल्या सेटवरच आपला वाढदिवस साजरा केल्याचं दिसून येत आहे. शिवाय सचिन आणि सुप्रियांनीसुद्धा श्रियाचा हा दिवस खास बनवला होता. श्रियाचं आपल्या आईबाबांसोबत एखाद्या मित्र-मैत्रिणींसारखं नातं आहे.