मराठमोळा क्रिकेटर ऋतुराज गायकवाड नुकतंच लग्नबंधनात अडकला आहे. ऋतुराजने आपल्या लेडी लव्हसोबत लग्नगाठ बांधत सर्वांनाच सुखद धक्का दिला आहे. काही दिवसांपूर्वी ऋतुराज गायकवाडचं नाव मराठी अभिनेत्री सायली संजीवसोबत जोडलं जात होतं. सायली संजीव आणि ऋतुराज गायकवाड रिलेशनशिपमध्ये असल्याच्या अफवा उठल्या होत्या. मात्र आता ऋतुराज गायकवाडने आपल्या गर्लफ्रेंडसोबत लग्नगाठ बांधत हा चर्चांना पूर्णविराम दिलं आहे. विशेष म्हणजे सायली संजीवने या नवंविवाहित जोडप्याला शुभेच्छा देत आनंद व्यक्त केला आहे. सायलीने या दोघांना शुभेच्छा देत आपण तुमच्यासाठी खूप जास्त खुश असल्याचं म्हटलं आहे. ऋतुराज गायकवाडने क्रिकेटर असणाऱ्या उत्कर्षा पवारसोबत लग्नगाठ बांधली आहे.