'सैराट' या ब्लॉकबस्टर सिनेमातून आर्ची अर्थातच अभिनेत्री रिंकू राजगुरु घराघरात पोहोचली आहे. आजही चाहत्यांमध्ये रिंकूची क्रेझ दिसून येते.
2/ 8
नागराज मंजुळे दिग्दर्शित आपल्या पहिल्याच चित्रपटातून रिंकू रातोरात स्टार बनली होती. महाराष्ट्रच नव्हे तर देशभरात या चित्रपटाची चर्चा झाली होती.
3/ 8
अभिनेत्री रिंकू राजगुरुचा मोठा चाहतावर्ग निर्माण झाला आहे. अभिनेत्रीच्या चाहत्यांना तिच्या व्यावसायिक आयुष्यासोबतच खाजगी आयुष्याबाबत जाणून घेण्यात प्रचंड रस असतो.
4/ 8
रिंकू कोणाला डेट करतेय? किंवा ती लग्न कधी करणार? असा प्रश्न नेहमीच तिच्या चाहत्यांच्या मनात असतो.
5/ 8
काही दिवसांपूर्वी रिंकूने एका युट्युब चॅनेलला मुलाखत दिली होती. यादरम्यान अभिनेत्रीला ती लग्न कधी करणार?आणि तुला कसा मुलगा हवा? असे प्रश्न विचारण्यात आले होते.
6/ 8
यावर उत्तर देत रिंकूने स्पष्ट सांगितलं होतं की, सध्या तरी मी याबाबत विचार केलाच नाहीय. आणि माझ्या आयुष्यात अजून तरी कोणी असा मुलगा नाहीय'.
7/ 8
त्यामुळे मी आता काहीच सांगू शकत नाही. पण ज्या दिवशी माझ्या आयुष्यात कोणी येईल तेव्हा मी स्वतःहुन ते जाहीर करेन. यामध्ये लपवून ठेवण्यासारखं काय आहे? असंही रिंकू म्हणाली होती'.
8/ 8
'सैराट' चित्रपटानंतर चाहते नेहमीच आकाश ठोसरसोबत रिंकूचं नाव जोडतात. आणि त्यांना एकत्र पाहण्याची अपेक्षा व्यक्त करतात.