'सैराट' चित्रपटामुळे घराघरात पोहचलेली आर्ची म्हणजेच अभिनेत्री रिंकू राजगुरु. रिंकूला तिच्या बिनधास्त अभिनय कौशल्यामुळे प्रेक्षकांनी भरघोस प्रतिसाद दिला आहे.
रिंकू पहिल्याच चित्रपटात हिट झाली. सैराटनंतर तिला अनेक सिनेमांची ऑफर मिळत आहे आणि तिची लोकप्रियताही वाढत आहे.
रिंकूनं जांभळ्या कलरच्या साडीमध्ये राजेशाही लुक केल्याचं दिसत आहे. तिचा लुक अनेकांच्या पसंतीस उतरत आहे.
'उदासियों की इतनी तलब अच्छी नहीं है, मुस्कुराए जनाब ये ज़िंदगी आपकी ही है..', असं कॅप्शन रिंकूनं दिलं आहे.
रिंकू कायम सोशल मीडियावर फोटो पोस्ट करत चाहत्यांच्या संपर्कात असते. एवढंच नाही तर आर्ची तिच्या खासगी आयुष्यातील गोष्टी आणि तिच्या आगामी प्रोजेक्टबद्दल देखील सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना सांगत असते.