बॉलिवूडमध्ये पुन्हा एकदा लगीनघाई दिसून येत आहे. अभिनेत्री रिचा चड्ढा आणि अली फजल येत्या 6 ऑक्टोबरला लग्नगाठ बांधणार आहेत.
दरम्यान दोघेही आपल्या प्री वेडिंग फंक्शन्सचा आनंद घेत आहेत. रिचा आणि अली आपल्या लग्नापूर्वीच्या कार्यक्रमांतील क्षण मोठ्या उत्साहाने जगत आहेत.
नुकतंच रिचा चड्ढाने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर आपल्या मेहंदी, हळदी आणि संगीत सोहळ्यातील काही खास फोटो शेअर केले आहेत.
या फोटोंमध्ये रिचा आणि अली अगदी थाटामाटात तयार झाले आहेत. या दोघांचा रॉयल लुक सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे.
लखनऊमध्ये अलीचं घर आहे आणि त्याठिकाणी अली आणि रिचाचे प्री वेडिंग फंक्शन मोठ्या धूमधडाक्यात साजरे होत आहेत.