मागील दोन महिन्यात काही मराठी सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीला आलेत. त्यातील एक सिनेमा म्हणजे रावरंभा.
रावरंभा सिनेमाच्या एक महिन्याआधी रिलीज झालेल्या महाराष्ट्र शाहीर या सिनेमाला टक्कर देताना दिसत आहे.
महाराष्ट्र शाहीर या सिनेमानं पाचव्या आठवड्यात पदार्पण केलं असून आतापर्यंत 5 कोटींची कमाई करण्यात यश मिळवलं आहे.
रावरंभा सिनेमानं पहिल्याच आठवड्यात 3 कोटींचा गल्ला जमवत इतर मराठी सिनेमाला चांगलंच आव्हान दिलं आहे.
पहिल्या आठवड्यात 3 कोटींची कमाई करणारा रावरंभा हा सिनेमा येणाऱ्या आठवड्यांमध्ये यशस्वी घोडदौड करेल अशी अपेक्षा वर्तवण्यात आली आहे.