नॅशनल क्रश म्हणून ओळखली जाणारी साऊथ सुंदरी रश्मिका मंदाना सध्या बॉलिवूडमध्ये जम बसवण्याचा प्रयत्न करत आहे.
2/ 8
काही दिवसांपूर्वी रश्मिकाने अमिताभ बच्चन यांच्यासोबत 'गुड बाय' सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. आता ती सिद्धार्थ मल्होत्रासोबत 'मिशन मजनू'मध्ये झळकणार आहे.
3/ 8
तत्पूर्वी अभिनेत्रीने एका मुलाखतीत आपल्या खाजगी आयुष्याबाबत काही खुलासे करत मनमोकळेपणाने गप्पा मारल्या आहेत.
4/ 8
नुकतंच दिलेल्या एका मुलाखतीत रश्मिकाने सांगितलं की, ती घरातील सर्व सदस्यांसोबत घरात काम करणाऱ्या सर्व्हंटच्यादेखील पाया पडते.
5/ 8
यावेळी बोलताना अभिनेत्रीने सांगितलं की, मी बाहेरून घरी परतल्यानंतर सर्वात आधी माझ्या आई वडिलांच्या आणि घरात असणाऱ्या मदतनिसांच्यापण पाया पडते.
6/ 8
कारण मला वाटतं आपण कोणासोबत भेदभाव करु नये. सर्वांचं आशीर्वाद आपल्याला चांगलं आयुष्य देतो. आशीर्वाद कोणाकडूनही मिळो तो चांगलाच असतो. त्यामुळे मी प्रत्येकांचा आशीर्वाद घेत असते.
7/ 8
अभिनेत्रीने सांगितलं की, ती सकाळी उठल्याबरोबर सर्वात आधी आपल्या पेट्ससोबत वेळ घालवते. त्यानंतर आपल्या मित्रांना जाऊन भेटते.
8/ 8
रश्मिकाच्या मते या गोष्टी तिला सर्वात जास्त आनंद देतात.