बॉलिवूडचा प्रसिद्ध फिल्ममेकर करण जोहर कायम चर्चेत असतो. करण जोहरने 'कुछ कुछ होता है' मधून दिग्दर्शनात पदार्पण केले. करणने बॉलिवूडमध्ये अनेक हिट चित्रपट दिले आहेत. करणला त्याच्या लहापणीच्या सर्व गोष्टी, त्याचा संघर्ष जगासमोर मांडायचा आहे. करण त्याच्या बायोपिकमधून त्याचं आयुष्य मोठ्या पडद्यावर मांडणार आहे. करणची अशी इच्छा आहे की, त्याच्या बायोपिकमध्ये अभिनेता रणवीर सिंहने त्याची भूमिका साकारावी. रणवीर ही भूमिका चांगली साकारु शकतो, असा विश्वास करणला आहे. करण जोहरने अलीकडेच व्हिडीओ-शेअरिंग अॅप रोपोसोवर नुकत्याच झालेल्या लाइव्ह चॅटमध्ये त्याने ही इच्छा व्यक्त केली.