पश्चिम बंगालच्या राणाघाट रेल्वे स्टेशनवर गाणं गाऊन रातोरात व्हायरल झालेली राणू मंडल आता काय करतेय असा प्रश्न अनेकंना पडला आहे. तिच्या व्हायरल झालेल्या गाण्यामुळे ती अचानक लाइमलाइटमध्ये आली होती. 'तेरी मेरी कहानी' हे तिचं गाणं देखील चांगलच हिट झालं.
राणू मंडलने तिचे राणाघाट याठिकाणी असणारे घर सोडले आणि ती एका नव्या घरात राहत होती. दरम्यान असा व्हिडीओ समोर आला होता की तिने तिच्या काही चाहत्यांबरोबर गैरवर्तन केले. मात्र लॉकडाऊन सुरू झाल्यावर राणू मंडल तिच्या आधीच्या आयुष्यात परतली आहे. स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार राणूकडे आता कोणतेही काम नाही आहे. त्यामुळे ती मीडियचा सामना करत नाही आहे.
सलमान खानने राणूचे गाणे ऐकल्याचा व्हिडीओ देखील काही दिवसांपूर्वी व्हायरल झाला होता. त्यानंतर राणू अधिक चर्चेत आली होती. मात्र पुन्हा राणूकडे आता काही काम नसल्यामुळे ती तिच्या जुन्या घरी गेली आहे.
लॉकडाऊनमध्ये लोकांना मदत करताना राणू मंडलचे फोटो समोर आले होते. पण एकदा समोर आल्यानंतर पुन्हा अशी मदत करताना राणू मंडल दिसल्या नाहीत. सोशल मीडियावर सर्वात आधी राणूबाबत माहिती देणाऱ्या अतींद्र चक्रवर्ती यांनी माहिती दिली की, काही लोकांना राणूच्या घरी नेण्यात आले होते. त्यांच्यासाठी तिने आवश्यक वस्तू खरेदी करून दिल्या. पण हा लॉकडाऊन एवढ्या काळासाठी चालेल याचा अंदाज राणूला देखील नव्हता. आता राणू देखील चांगल्या स्थितीमध्ये नाही आहे.
असे अनेकांनी सांगितले होते की, रातोरात स्टार बनणाऱ्या राणूमध्ये अहंकार निर्माण झाला होता. तिच्या चाहत्यांशी गैरवर्तन केल्याचे देखील समोर आले होते. यामुळे हळूहळू तिची प्रसिद्धी कमी होत गेली.
एवढेच नव्हे तर असे देखील समोर आले होते की, राणूच्या या वर्तनाबाबत स्वत: हिमेशने देखील नाराजी व्यक्त केली होती. राणूच्या जवळच्या व्यक्तीकरवी त्याने तिला असे सांगितले होते की तिने चाहत्यांची माफी मागणे गरजेचे आहे. पण असे राणूने केले नाही.
गेल्या वर्षी 31 डिसेंबर रोजी एका राणू मंडलला (Ranu Mandal) एका टीव्ही चॅनेलच्या प्रोग्राममध्ये येणाऱ्या सेलिब्रिटींच्या यादीमध्ये समाविष्ट केलं होतं. या कार्यक्रमात महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) देखील सहभागी होणार होते. पण चाहत्यांशी केलेल्या गैरवर्तनामुळे राणूचे नाव या यादीतून काढण्यात आले होते.